Siso’ही लोकं मला मारून टाकतील…’ सुशांतने केला होता बहिणीला SOS

0

मुंबई l आता एनसीबी सुशांत आत्महत्याप्रकरणी एक मोठा खुलासा झाला आहे. सुशांतने 9 जून रोजी त्याची बहिण मीतू सिंहला फोन करून त्याला वाटत असणाऱ्या भीतीबद्दल सांगितले होते. तो धोक्यात असल्याचे त्या फोन कॉलवरून वाटत होते.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत च्या मृत्यूला आज तीन महिन्यांपेक्षाही अधिक काळ लोटला आहे. दरम्यान आजही याप्रकरणी तपास सुरू आहे. नवभारत टाइम्सने दिलेल्या एका अहवालानुसार, सुशांत सिंह राजपूतने त्याच्या बहिणीला मृत्यूच्या 5 दिवस आधी 9 जून रोजी SOS कॉल केला होता. सुशांतने त्याच्या बहिणीला असे म्हटले होते की, ‘हे लोकं मला फसवू शकतात, मला अशी भीती वाटते आहे की मला मारून टाकतील.’ अहवालात असे देखील म्हटले आहे की त्याने रिया चक्रवर्तीला देखील संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. तिने 8 जून रोजी सुशांतचे घर सोडले होते.

सुशांतला कोणाची भीती वाटत होती? तो कुणाबद्दल बोलत होता? असे काही सवाल या मीडिया अहवालानंतर उपस्थित केले जात आहेत.सुशांत सिंह राजपूत प्रकरणाशी संबंधित (Drugs case) ड्रग्ज कनेक्शनमध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला (Rhea Chakraborty) अटक करण्यात आली आहे. मात्र येत्या काळात तिच्या अडचणी अधिक वाढण्याची शक्यता आहे.

कोर्टाने रियाची अटक 6 ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. आता 6 ऑक्टोबरपर्यंत रियाला तुरुंगात राहावं लागणार आहे. रिया चक्रवर्तीच्या चौकशीनंतर नार्कोटिक्‍स कंट्रोल ब्‍यूरो (NCB) ने ड्रग्‍स प्रकरणात तिला अटक केली होती. तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि काही ड्रग्‍स तस्‍कऱ्यांनादेखील अटक करण्यात आलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here