चीन-भारत संघर्षः ७३ टक्के भारतीयांचा मोदी सरकारवर विश्वास,

0

नवी दिल्लीः

चीन-भारत सीमेवरील संघर्षानंतर चीनसंदर्भात केंद्र सरकारच्या धोरणांविषयी सी व्होटरनं सर्व्हे केला होता. या सर्व्हेमध्ये ७३ टक्के भारतीयांनी मोदी सरकारच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या धोरणावर विश्वास दाखवला आहे.

१५ जून रोजी गलवान व्हॅलीत संघर्ष झाला. यात २० भारतीय जवान शहीद झाले. त्यामुळे भारतात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या मुद्यावरून विरोधकांकडून सरकारवर टीकाही केली जात आहे.

गलवान व्हॅलीचा मुद्दा चर्चेत असतानाच सी व्होटरनं एक सर्व्हे केला होता. या सर्व्हेत भारतीयांना काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर ३९ टक्के लोकांनी सांगितले की मोदीनी चीन सडेतोड उत्तर दिले आहे. तर ६० ट्क्के लोकांचं उत्तर नाही असं आहे.

, ७३.६ टक्के भारतीयांनी सरकारवर विश्वास दाखवला असून सध्या चीनसोबत सीमेवरून सुरू असलेला संघर्ष हाताळण्यात मोदी सरकार सक्षम आहे  असे लोक म्हणतात. विरोधी पक्षाचा जरी मोदींवर विश्वास नसला तरी जनतेचा विश्ववास असल्याचा सर्वे मधून समोर आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here