सिन्नर:देशवंडी येथे वीज कोसळून युवतीचा मृत्यू

0

वेगवान न्यूज / शरद शेळके

सिन्नरः  (नाशिक) तालुक्यातील देशवंडी येथील एक १९ वर्षीय तरुणीचा दुपारी वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. अक्षदा विलास कापडी असे या मृत तरुणीचे नाव असून सिन्नर देशवंडी रस्त्यावरील डोबी मळ्यात ही घटना घडली.

दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान घराबाहेर उभ्या असलेल्या अक्षदाच्या अंगावर वीज कोसळल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.सिन्नरच्या शासकीय रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here