पुणेसाठी धक्कादायकः कोरोनाची पहा किती रुग्ण निघाले

0

पुणे, 2 पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासामध्ये तब्बल1251 रूग्णांची वाढ झाली आहे. यात पुणे मनपा क्षेत्रात 860 , पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रात 282, पुणे ग्रामीण हद्दीत 64 तर कॅन्टॉनमेंट परिसरात 45 नवे रूग्ण आढळून आले आहेत. एकाच दिवसात झालेली ही जिल्ह्यातील सर्वाधिक वाढ आहे.

मुंबई आणि पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. तर गेल्या 24 तासामध्ये आतापर्यंत सर्वाधिक

गंभीर बाब म्हणजे, एकाच दिवसात 25 जणांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे मृत्यूदर कमी करण्याचे लक्ष ठेवल्यानंतर प्रशासनाला ना मृत्यूदर कमी करता येत आहे ना रूग्णसंख्या. त्यामुळे पुण्यात परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत चालली आहे.गंभीर बाब म्हणजे, एकाच दिवसात 25 जणांचा मृत्यू झाला आहे.

पुण्यात याआधी 74 कोरोना प्रतिबंधित झोन होते. त्यापैकी 15 मायक्रोझोन कोरोनामुक्त झाले होते. नवीन आदेशातून या 15 मायक्रोझोनची नावं वगळली आहे. तर गेल्या 15 दिवसांत तब्बल 50 नवे झोन कोरोनाबाधित बनले आहे.

9 मायक्रोझोनची फेरचना केल्याने पुणे शहरात आता 109 मायक्रोझोन तयार झालं असून त्याचे एकूण क्षेत्रफळ 6.69 स्वेअर किलोमीटर इतके असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here