सुशांतच्या वडिलांचा धक्कादायक आरोप : रियाने 15 कोटी रुपये स्वतःच्या नातेवाईकांच्या खात्यावर वळवले…

0

पाटणा l काही दिवसापूर्वी सुशांत ने आत्महत्या केल्यामुळे बॉलीवूड सह महाराष्ट्रात हळहळ पसरली होती. याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून तपास अद्याप सुरूच आहे.

आत्महत्येचा मुंबई पोलिसांकडून 39 जणांचा जबाब नोंदविण्यात आले आहेत. बाॅलिवूडमधील मोठ्या हस्तींचाही यामध्ये समावेश आहे. मात्र सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी बिहारमध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधातच गुन्हा दाखल केला आहे.

पाटण्यातील राजीवनगर पोलिस ठाण्यात के. के. सिंह यांनी रिया विरोधात गुन्हा नोंदविताना म्हटलं आहे की, सुशांतला 2019 पर्यंत कोणताही मानसिक आजार नव्हता. रियाच्या संपर्कात आल्यानंतरच त्याला मानसिक आजार जडले. तसेच त्याच्यावरील मानसिक उपचारासाठी कुटुंबियांची कसलीच परवानगी घेण्यात आली नव्हती.

माझ्या मुलाच्या खात्यात 17 कोटी होते. यातील 15 कोटी रूपये त्याच्या निगडीत नसलेल्या व्यक्तींच्या खात्यावर वर्ग झाल्याचं बॅक स्टेटमेंटमधून समोर आलं आहे. रियाने तीच्या कुटूंबीयांना यातील किती पैसे दिले याचाही तपास करण्यात यावा, अशी मागणी के. के. सिंग यांनी एफआयआरमधून केली आहे.

रिया त्याच्या आयुष्यात आल्यानंतरच त्याला चित्रपटात काम मिळालं नाही. रियानं सुशांतवरील मानसिक आरोप जगजाहीर करण्याचीही धमकी दिल्याची माहिती आहे. रिया आणि तीच्या नातेवाईकांनी षडयंत्र करून माझ्या मुलाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोपही त्यांनी यावेळेस केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here