धक्कादायक ! 89 वर्षीय डॉक्टरने तब्बल 49 महिला पेशंटमध्ये आपलेच स्पर्म टाकले,डॉक्टर झाला 49 मुलांंचा बाप!

0

नेदरलॅंड l नेदरलॅंड मध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.चक्क नेदरलँड्सच्या रॉटेरडम मध्ये 89 वर्षीय डॉक्टरने IVF तंत्रज्ञानाचा गैरवापर करुन आपल्या तब्बल 49 पेशंट महिलांंमध्ये आपलेच स्पर्म (Sperms) टाकल्याचं कळतंय.जन कारबात याचे आयव्हीएफ क्लिनिक आहे.

कारबात हा एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 49 मुलांचा बाप असल्याचे समोर आले आहे. याही पेक्षा धक्कादायक म्हणजे जेव्हा हे सगळे प्रकरण समोर आले तेव्हा कारबात यांंचा मृत्युही झाला होता.

त्यामुळे त्यांंच्यावर काहीही कारवाई करणे शक्य होणार नाही. काय आहे हा एकुण प्रकार सविस्तर जाणून घ्या..

डिफेन्स फॉर चिल्ड्रन नावाच्या संस्थेने रॉटेरडम या व लगतच्या भागातील मुलांंचा वैद्यकीय तपास केला होता ज्यात तब्बल 49 मुलांंचे डीएनए रिपोर्ट्स हे समसमान आल्याचे समजले. ही मुले कारबात यांंच्या क्लिनिक मध्ये IVF तंंत्रज्ञानाने जन्मलेली होती. यातील एक मुल तर अगदी डॉ. कारबात यांंच्यासारखेच दिसणारे होते. याप्रकरणी काही वर्ष खटला सुद्धा सुरु होता.

ज्यात कारबात यांंनी स्पर्म डोनर ऐवजी आपले स्वतःचेच स्पर्म महिलांंमध्ये टाकल्याचे सिद्ध झाले होते.दरम्यान, 2009 मध्ये कारबात यांंच्या क्लिनिकवर काही अनियमिततेबाबत आरोप केले गेले होते, त्यानंतर क्लिनिक बंद करण्यात आले होते. 2017 मध्ये डॉ. कारबात यांंचा नैसर्गिक मृत्यु झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here