लज्जास्पद ! विमानतळावर महिला प्रवाशांच्या प्रायव्हेट पार्टची आक्रमकपणे तपासणी…

0

दोहा l कतारमधील दोहा विमानतळावर एका अज्ञात प्रवाशी महिलेवर संशय आल्याने सर्वच प्रवाशी महिलांच्या गुप्तांगाची अत्यंत आक्रमक पद्धतीने तपासणी करण्यात आली. यावर सर्वत्र संताप व्यक्त होत असून ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सुद्धा संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.या प्रकरणाचे संपप्त पडसात जागतिक स्तरावर उमटवण्यास सुरूवात आली आहे.

10 विमानातील महिला प्रवाशांच्या गुप्तांगाची अत्यंत क्रुरपद्धतीने तपासणी केली गेली. शिवाय सिडनीला निघालेल्या कतार एअरवेजच्या विमानातून महिला प्रवाशांना जबरदस्तीने उतरवण्यात आले आणि प्रायव्हेट पार्टची आक्रमक पद्धतीने तपासणी करण्यात आली.याबाबत ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री मरिसे पायने यांनी सांगितले.

कतार एअरपोर्टच्या बाथरूममध्ये एक बेवारस भृण सापडल्याने हे भृण टाकणार्‍या महिलेला शोधण्यासाठी दोहा एअरपोर्टच्या अधिकार्‍यांनी सर्वच महिला प्रवाशांच्या गुप्तांगाची जबरदस्तीने तपासणी सुरू केली. ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री मरिसे पायने म्हणाले, एकूण 10 एअरक्राफ्टच्या महिला प्रवाशांच्या गुप्तांगाची तपासणी करण्यात आली.

हा प्रकार अत्यंत त्रासदायक व संतापजनक होता. आम्ही रिपोर्टची प्रतीक्षा करीत आहोत. यापूर्वीच दोहाच्या एअरपोर्टने महिलांच्या झडती केल्याचे मान्य केले आहे. मात्र एअरपोर्टने सविस्तर सांगण्यास नकार दिला आहे. दरम्यान, एअरपोर्टने अपील केले आहे की, बाळाच्या आईने त्याला घेऊन जावे.

2 ऑक्टोबर रोजी सिडनीला जाणार्‍या 18 महिलांसह अनेक महिला प्रवाशांना अशा संताजनक तपासणीला सामोरे जावे लागले. दरम्यान, या घटनेनंतर आता ऑस्ट्रेलिया आणि कतारमध्ये राजकीय वाद उफाळला आहे.

ऑस्ट्रेलियाने या घटनेवर निषेध व्यक्त केला आहे. ऑस्ट्रेलियाचे अधिकारी अन्य देशांसोबत मिळून काम करतात व सर्वांना सन्मानाची वागणूक देतात. या देशातील महिलांना अपमानास्पद वागणुक मिळाल्याने येथील अधिकार्‍यांनी संताप व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here