टिक टॉकच्या बंदीनंतर सीईओ काय म्हणाले तुम्हीचं पहा

0

वृत्तसंस्था

टिकटॉकच्या सीईओने भारतातील आपल्या कर्मचाऱ्यांसाठी पत्र लिहिलं आहे. केविन मेयर यांनी आपल्या पत्रातून कर्मचाऱ्यांना इंटरनेटचे लोकशाहीकरण करण्यासाठी आपण प्रयत्न करत असून मोठ्या प्रमाणात त्याला यशही मिळालं असल्याचं म्हटलं आहे.आमचे कर्मचारी आमची मोठी ताकद असून त्यांची काळजी घेणं आमची प्राथमिकता आहे,” असं केविन यांनी सांगितलं आहे

तसंच आपण आपल्या संकल्पासाठी कटिबद्द आणि वचनबद्द राहूयात. भागधारकांची चिंता दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असं आवाहन यावेळी त्यांनी केलं आहे.

केविन टिकटॉकचे मुख्य कार्यकारी तसंच बाइटडान्सचे मुख्य ऑपरेशन अधिकारीदेखील आहेत. कंपनीच्या वेबसाईटवर त्यांनी ही पोस्ट प्रसिद्द केली आहे.

टिकटॉक भारतीय कायद्यानुसार सर्व डेटा गोपनीयता आणि सुरक्षेच्या नियमांचे पालन करत असून आणि वापरकर्त्याची गोपनीयता आणि अखंडता यांना सर्वाधिक महत्त्व दिलं जात आहे,” असंही केविन यांनी पत्रातून सांगितलं आहे.

भारतीय कर्मचाऱ्यांसाठी संदेश’ असं या पोस्टचं शिर्षक असून केविन यांनी भारतातील २० कोटी युजर्सना आपला आनंद, क्रिएटीव्हिटी, अनुभव जगापर्यंत पोहोचवता यावेत यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली असं सांगितलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here