बॉलिवूडमधून धक्कादायक बातमी; संजूबाबाला कॅन्सर

0

मुंबई l काही दिवसांपूर्वी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने 8 ऑगस्टला संजय दत्तला मुंबईत लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र अभिनेता संजय दत्तबद्दल एक मोठी बातमी आली आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार संजय दत्तला कॅन्सर असल्याचं निदान झालं आहे.

संजय दत्तला लीलावती रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिथे त्याची Corona चाचणीसुद्धा झाली. Covid-19 चा रिपोर्ट निगेटिव्ह आला म्हणून दत्त कुटुंबीयांना दिलासा मिळाला असतानाच आता ही धक्कादायक बातमी आली आहे.61 वर्षीय संजय दत्त यांना फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचं निदान झालं आहे. त्यंना पुढच्या उपचारांसाठी अमेरिकेला न्यायचा विचार असल्याचं समजतं.

‘मी कामापासून काही काळ ब्रेक घेणार आहे. लवकरच परत येईन.’ असं संजूबाबाने Tweeter वर लिहिलं होतं. माझ्या चाहत्यांनी आणि हितचिंतकांनी उगाच अफवा पसरवू नयेत. माझे कुटुंबीय माझ्या बरोबर आहेत आणि काही वैद्यकीय उपचारांसाठी मी ब्रेक घेतोय, असं संजयने काही तासांपूर्वीच जाहीर केलं होतं. तेव्हापासूनच चर्चांना उधाण आलं होतं.अखेर संजय दत्तला नेमकं काय झालं याचा उलगडा झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here