सलून, ब्युटी पार्लर सुरू होणारी व्हायरल पोस्ट फेक!

0

मुंबई –

लॉक डाऊन सुरू असला तरी तरी सलून, ब्युटी पार्लर उघडण्याची वाट अनेक जण तितकीच आतुरतेने पाहत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल झालेली अधिसूचना वाचून आनंदाच्या भरात तुम्ही तात्काळ फॉरवर्ड करणार असाल, तर जरा थांबा! कारण सलून, ब्युटी पार्लर उघडण्याबाबत माहिती देणारी अधिसूचना फेक आहे. खुद्द महाराष्ट्र सरकारने याविषयी स्पष्टीकरण दिलं आहे. लॉकडाऊनच्या काळात केसांना कात्री लावण्या अजून काही काळ थांबावे लागेल.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अधिसूचना या फेक आहेत. अशा प्रकारचे कुठलेही आदेश देण्यात आलेले नाहीत, असं राज्य सरकारने ट्विटरवरुन स्पष्ट केलं आहे.सलून, ब्युटी पार्लर, पार्क आणि तत्सम सुविधा 29 मेपासून सुरु होणार नाहीत. लॉकडाऊनच्या नियमात राज्य सरकारने कुठलेही बदल केलेले नाहीत.

फेक मेसेज काय आहे?

“बगिचे, मैदानं, फूटपाथ अशा सार्वजनिक ठिकाणी जॉगिंग, वॉकिंग, रनिंग, सायकलिंग आणि इतर शारिरीक व्यायाम करण्यास पहाटे पाच ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत महाराष्ट्र सरकारने परवानगी दिली आहे. सायकलिंग करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल” अशा प्रकारच्या फेक अधिसूचना सोशल मीडियावर व्हारल झाल्या आहेत.

सोशल मीडियावरील या अधिसूचना फेक आहेत. त्यावर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here