मानसिक आजार,ड्रग्जचं व्यसन असलेल्या मुलाच्या प्रेमात रिया पडली हिच चूक होती – वकिल

0

मुंबई । सुशांत सिंग राजपुत आत्महत्या प्रकरणात नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने रिया चक्रवर्ती हिला अटक केल्यानंतर तिचे वकिल सतीश मानेशिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देशातील तीन केंद्रीय तपास यंत्रणांकडून रियाला त्रास दिला जातोय, असा सवाल सतीश मानेशिंदे यांनी उपस्थित केला आहे. ड्रग्जचं व्यसन असलेल्या , मानसिक आजार असलेल्या एका मुलाच्या प्रेमात ती पडली हिच तिची चूक होती, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.रियाला अटक झाल्यानंतर तिचे वकिल सतीश मानेशिंदे म्हणाले, ‘न्यायाची थट्टा चालवली आहे.

तीन केंद्रीय तपास यंत्रणा मिळून एका महिलेची पिळवणूक करत आहेत, कारण ती अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या व्यक्तीच्या प्रेमात होती. ज्याला अनेक वर्षांपासून मानसिक आरोग्याच्या समस्येनं ग्रासलं होतं. जो मुंबईतील पाच अग्रगण्य मानसोपचार तज्ज्ञांच्या देखरेखीखाली होता. ज्याने बेकायदेशीर औषधी आणि ड्रग्जचं सेवनातून आत्महत्या केली,’ अशी खंत रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी व्यक्त केली. प्रेम करणे गुन्हा असेल, तर या गुन्ह्यासाठी कोणतेही परिणाम भोगण्यास रिया तयार आहे. निर्दोष असल्याने तिने अटक टाळण्याचा प्रयत्न केलेला नाही.

ती स्वतः अटक करून घेण्यासही तयार आहे, असं रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी यापूर्वीच सांगितलं होतं.सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सुरू असतानाच ड्रग्ज तस्करी व सेवन प्रकरण समोर आलं होतं. या प्रकरणात अमली पदार्थविरोधी विभागानं तपास सुरू केली होता.

मागील तीन दिवसांपासून ड्रग्ज प्रकरणी रियाची चौकशी सुरू होती. आज (८ सप्टेंबर) तिला अटक करण्यात आली. २८ ऑगस्टला तपासासाठी मुंबईत आलेल्या एनसीबीच्या विशेष पथकाने १० दिवसांत शोविक, मिरांडा, दीपेशसह आठ आरोपींना अटक करून अमली पदार्थ, रोकड आणि परकीय चलन हस्तगत केले. सुशांतचा नोकर दीपेश सावंतच्या चौकशीतून रियाचे नाव पुढे आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here