फोन खरेदी करण्यापूर्वी हे वाचा ! हा फोन mi, ओप्पो, सॅमसंग कंपन्यांचे मार्केट तोडणार ! फक्त किंमत.

0

मुंबई l नावाजलेल्या मोटोरोला कंपनीनं mi व realme , Samsung ,oppo मोबाईल कंपन्यांना टक्कर देण्यासाठी भारतामध्ये आपला नवा स्मार्टफोन Moto E7 Plus लॉन्च केला आहे.

या फोनचे खास वैशिष्ट्य म्हणजे 5000mAh ची दमदार बॅटरी आणि 48 मेगापिक्सलचा कॅमेरा हे आहे. मात्र ग्राहकांना पुढील सात दिवसात खरेदी करता येणार आहे.

30 सप्टेंबरपासून दुपारी 12 वाजल्यापासून फ्लिपकार्टवर याची खरेदी करू शकता. कंपनीने फोनची किंमत 9 हजार 499 रुपये ठेवली आहे. निळ्या आणि नारंगी रंगात हा फोन उपलब्ध आहे.

काय आहे फोन मध्ये –
– 5000mAh ची दमदार बॅटरी.
– फोनला 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. मेमरी कार्डच्या मदतीने यात वाढ केली जाऊ शकते.
– फोनला 6.5 इंचाचा Max Vision HD + डिस्प्ले देण्यात आला आहे.
– फोनमध्ये क्वॉलकॉमचा 1.8GHz स्पीड वाला स्नॅपड्रॅगन 460 प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी एड्रेनो 610 जीपीयू देण्यात आले आहे.
– फोनला रियर पॅनल फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

कॅमेरा –
फोनला ड्युल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे. तर दुसरा कॅमेरा 2 मेगापिक्सलचा आहे. सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here