RBI ची मोठी घोषणा ! आता इंटरनेटशिवाय करता येणार मोबाइल किंवा कार्ड पेमेंट !

0

नवी दिल्ली l लवकरच आता कार्ड आणि मोबाइलच्या माध्यमातून ऑफलाइन म्हणजेच इंटरनेटशिवाय सहज पेमेंट करता येणार आहे.याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) गुरुवारी पायलट स्कीमवर ऑफलाइन अर्थात इंटरनेटशिवाय कार्ड किंवा मोबाइलच्या माध्यमातून छोट्या पेमेंट संबंधित पेमेंट स्कीमची (Offline Payment Through Cards) घोषणा केली आहे.

सध्या इंटरनेट द्वारे पेमेंट करण्याचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढले आहे. अनेक वेळा डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डचा वापर करताना पेमेंट रद्द होते. अनेक कारणांमुळे तुमचे पेमेंट फेल होऊ शकते. Internet connectivity ची कमतरता हे त्यातील एक महत्त्वाचे कारण आहे.यावर उपाय म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मोठी घोषणा केली आहे.

ग्रामीण भागात ज्याठिकाणी इंटरनेट कनेक्टिव्हिटी कमी आहे, अशा ठिकाणी देखील डिजीटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्याचा या योजनेचा मानस आहे. विकासात्मक धोरणांबाबत बोलताना आरबीआयने अशी माहिती दिली की देशांतील केंद्रीय बँक इतर संस्थांना ऑफलाइन पेमेंट सुधारण्यासाठी प्रोत्साहित करत आहे.

यासाठी पायलट स्कीमअंतर्गत युजरचे हित, व्यवहारातील सुरक्षा इत्यादी बाबी लक्षात ठेवून ऑफलाइन पेमेंटच्या माध्यमातून छोट्या रकमेच्या पेमेंटबाबतचा हा प्रस्ताव आहे.यावेळी अशी माहिती देण्यात आली आहे की, लवकरच याबाबत आदेश जारी केले जातील. याकरता गाइडलाइन्स देखील जारी केल्या जातील, अशी माहित आरबीआयकडून देण्यात आली आहे.

आरबीआयकडून अशी माहिती देण्यात आली की, ग्रामीण भागात इंटरनेट नसल्यामुळे किंवा कमी प्रमाणात असल्यामुळे अनेकदा पेमेंट रद्द होतात. यामुळे कार्ड, वॉलेट किंवा मोबाइलचा वापर करून ऑफलाइन पेमेंटची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. यामुले डिजीटल व्यवहारांना चालना मिळेल.

केंद्रीय बँकेने यावेळी अशी देखील माहिती दिली की, Payment System Operators (PSOs) ना Online Dispute Resolution (ODR)लागू करावे लागेल. डिजीटल व्यवहार वाढल्यानंतर तक्रारी देखील वाढल्या आहेत. तक्रारींच्या निराकरणासाठी ही व्यवस्था नियमांवर आधारित आणि पारदर्शी असेल.

कसे करेल काम?

-पेमेंट remote or proximity मोडमध्ये केले जाईल

-अहवालांच्या मते पेमेंट कार्ड, वॉलेट किंवा मोबाइलसह कोणत्याही अन्य चॅनेलच्या माध्यमातून केले जाऊ शकते

-या व्यवहाराची मर्यादा जास्तीत जास्त 200 रुपये असेल

-कोणत्याही Additional Factor of Authentication (AFA)शिवाय हा व्यवहार ऑफर केला जाऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here