कोरोनाची रशियामध्ये लस तयार l बाजारात कधी येणार ?

0

रशिया l जगभरातील अनेक देश कोरोना महामारीपासून सुटका व्हावी यासाठी त्याचा बिमोड करणारी लस शोधण्याचा अहोरात्र प्रयत्न करत आहेत. याच दरम्यान सर्वांना दिलासा देणारी एक आनंदाची बातमी रशियातून आली आहे.

संपूर्ण जग सध्या जीवघेण्या कोरोना व्हायरसविरोधातील लढाई लढत आहे. यामुळे रशियाच्या आरोग्यमंत्र्यांनीच आता विश्वासार्ह लसीचे परीक्षण पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे.

गामालेया इंस्टिट्यूटने तयार केलेली ही तीच लस आहे. त्याचबरोबर इतर दोन कंपन्यांनी क्लिनिकल ट्रायलसाठी परवानगी मागितली आहे. दि गामालेया इंस्टिट्यूटच्या लसीसंदर्भात, ती 10 ऑगस्ट अथवा त्यापूर्वीच बाजारात उपलब्ध होईल, असा दावा करण्यात आला होता.यासंदर्भात रशियातील स्थानिक वृत्तसंस्था स्पुतनिक न्यूज डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, रशियाचे आरोग्य मंत्री मिखाइल मुराश्को यांनी सांगितले आहे, की गामालेयाच्या कोरोना प्रतिबंधक लसीचे परीक्षण पूर्ण झाले असून ही लस आता बाजारात केव्हा उपलब्ध करुन द्यायची हे संबंधित वैज्ञानिकांवर अवलंबून आहे.गेल्या महिन्यातच मॉस्को येथील गामालेया इंस्टिट्यूटच्या वैज्ञानिकांनी दावा केला होता, की ऑगस्ट महिन्याच्या मध्यापर्यंत कोरोनाच्या पहिल्या लसीला ते मंजुरी देऊ शकतात.

याचाच अर्थ पुढील दोन महिन्यांत कोरोना व्हायरसची लस रशिया बाजारात आणेल. सीएनएन चॅनलशी बोलताना रशियन अधिकारी आणि वैज्ञानिकांनी सांगितले होते, की लसीला 10 ऑगस्ट अथवा त्या पूर्वीच मंजुरी देण्यासंदर्भात ते प्रयत्न करत आहेत.

Russian health minister says #COVID19 vaccine trials have been completed https://t.co/vyD8XHcX4W

त्याचबरोबर गामालेया इंस्टिट्यूटच्या वैज्ञानिकांनी दावा केला आहे की, या लसीला 10 ऑगस्टपर्यंत ते सर्व सामान्य नागरिकांसाठी मंजुरी देतील. पण, फ्रंटलाइन हेल्थवर्कर्सना ही लस सर्वप्रथम देण्यात येईल. रशियाचे सोवरन वेल्थ फंडचे प्रमुख किरिल मित्रिव म्हणाले, आम्ही ज्या प्रकारे अवकाशात स्पुतनिक हे पहिले सॅटेलाईट सोडले होते, हा तसाच ऐतिहासिक क्षण आहे. स्पुतनिकसंदर्भात ऐकल्यानंतर अमेरिकन लोक हैराण झाले होते. तसेच ही लस लॉन्च झाल्यानंतरही ते पुन्हा एकदा हैराण होणार आहेत. पण अद्याप, रशियाने या लसीच्या परीक्षणाचा डेटा जाहीर केलेला नाही. त्यामुळे ही लस किती प्रभावी असेल हे सांगितले जाऊ शकत नाही.रशियन लसीच्या डेव्हलपर्सनी आपल्या लसीच्या चाचणीचा दुसरा टप्पा 3 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे ठरवले होते.

यानंतर तिसऱ्या टप्प्याच्या परीक्षणाला सुरुवात होईल. रशियन वैज्ञानिकांनी म्हटले आहे, की ही लस फार लवकर तयार करण्यात आली. कारण ही आधीपासूनच अशा प्रकारच्या इतर आजारांशी लढण्यात सक्षम आहे. हेच म्हणणे इतरही काही देशांतील वैज्ञानिकांचे आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले, की ह्यूमन ट्रायलसाठी रशियन सैनिकांनी वॉलिंटीअर्स म्हणून काम पार पाडले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here