‘प्रभू श्रीराम’चा जयघोष अमेरिकेच्या राजधानीत…

0

वॉशिंग्टन : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोध्यातील मंदिरं, भूमिपूजन सोहळ्याचं ठिकाण सॅनिटाइझ करण्यात आलं आहे. दुपारी 12.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असणारा राम मंदिराचा वाद अखेर संपला असून आज प्रभू श्रीरामाच्या मंदिर उभारणीसाठी भूमिपूजन करण्यात येणार आहे. या भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्यानगरी सजली आहे.

राम मंदिरासाठी होण्याऱ्या भूमिपूजनाचा उत्साह आणि आनंद त्यांनाही गगनात मावेनासा झाला होता. केवळ भारतातच नाही तर अमेरिकेतही याचा आनंद आणि उत्साह साजरा केला जात असल्याचं पाहायला मिळालं. भारतातच नाही तर बाहेरही या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आनंद साजरा केला जात असल्याचं पाहायला मिळत आहे. अमेरिकेची राजधानी असलेल्या वॉशिंग्टन डिसीमध्ये भक्तांनी एकत्र येत प्रभू श्रीरामचा जयघोष केला.

भूमिपूजनाआधी रामलल्लाला हिरव्या वस्त्रांनी सजवण्यात आल्याचं पाहायला मिळालं. भूमिपूजनाआधी अयोध्यानगरीच नाही तर देशभरात विविध ठिकाणी भक्तांकडून प्रभू श्रीरामचा जयघोष, भजन, जागर करण्यात आला आहे. नागपुरात राष्ट्रीय स्वयं सेवक संघ कार्यालयाबाहेर रांगोळीनं सजवण्यात आलं आहे. देशभरात जल्लोषाचं वातावरण आहे.

भूमिपूजन सोहळा आणि पंतप्रधान मोदी आज काय संबोधन करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या सोहळ्याला 200 लोकांना निमंत्रण देण्यात आलं आहे.गाझियाबादमध्ये भक्तांकडून कुठे भजन तर कुठे जय श्रीराम असे स्वर ओठी उमटत आहेत. भक्तीमय वातावरणात अयोध्या नगरी न्हाऊन निघाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here