आ.मेटेंना धक्का; शिवसंग्रामचे उपजिल्हाध्यक्ष राम जाधव यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

0
वेगवान न्यूज / केशव मुंडे
बीडः
आ.विनायक मेटे यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे शिवसंग्रामचे युवक जिल्हा उपाध्यक्ष दगडीशहाजनपूरचे सरपंच राम जाधव यांनी शिवसंग्रामला राम-राम ठोकत आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशाने आ.विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम युवक आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूकीच्या नंतरही येणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बेरजेचं राजकारण लक्षात घेता आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद शहरी आणि ग्रामीण भागात अधिक मजबुत होवू लागली आहे.
शिवसंग्राम युवक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष कामखेडा गणातील दगडी शहाजानपुर येथील सरपंच राम जाधव यांनी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. आ.विनायक मेटे यांच्या वाढदिवसादिवशीच शिवसंग्रामच्या युवक जिल्हा उपाध्यक्ष राम जाधव यांनी शिवसंग्रामला सोडचिठ्ठी दिल्याने आ.मेटेंना चांगलाच धक्का बसला आहे.

दगडी शहाजानपूरचे सरपंच राम जाधव यांनी प्रवेश केल्यानंतर आ.संदिप क्षीरसागर, छावाचे जिल्हाध्यक्ष अशोक रोमण, बळीराम गवते, संतोष पवार यांनी त्यांचे स्वागत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here