पुणेकरांनो रात्री 11 नंतर घरगुती बेत आखूनच थर्टी फस्ट साजरा करा ?

0

पुणे l नववर्षाच्या निमित्ताने आज पुणेकरांना रात्री 11 नंतर घरगुती बेत आखूनच थर्टी फस्ट साजरा करावा लागणार आहे.नववर्षाच्या आगमनासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले असताना पुणेकरांच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे. कारण, पुणे महानगरपालिकेने 31 डिसेंबरला (31St December) खाद्यपदार्थांच्या घरपोच डिलिव्हरीवर निर्बंध घातले आहेत.पुणे महानगरपालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे रात्री 10.45 पर्यंतच खाद्यपदार्थांची होम डिलिव्हरी सुरु राहील. त्यानंतर पुणेकरांना कोणतेही खाद्यपदार्थ घरपोच मिळणार नाहीत. याशिवाय, पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व हॉटेल्स, फूड कोर्ट आणि रेस्तराँ तसेच बार 31 डिसेंबर रोजी रात्री पावणे अकरापर्यंतच सुरु राहणार आहेत. नागरिकांनी नवीन वर्षाचे स्वागत करताना काय काळजी घ्यावी यासंदर्भातील मार्गदर्शक तत्वे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी आदेश जारी केला आहे.

31 डिसेंबरला रात्री दारु पिऊन गाडी चालवू नये, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी मुंबई पोलीस रस्त्यावर तैनात असणार आहे. त्यामुळे जर कोणी रस्त्यावर दारु पिऊन गाडी चालवली, तर त्याची थेट रुग्णालयात पाठवून ब्लड टेस्ट केली जाणार आहे.नववर्षाच्या निमित्ताने आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी रस्त्यांवर गर्दी करु नये, असे आवाहन ठिकठिकाणी करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here