भारतात आजपासून ‘पबजी’ खेळता येणार नाही !

0

नवी दिल्ली l काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने 118 अॅप्सवर बंदी आणली होती. यामध्ये तरूणाईला भूरळ घालणाऱ्या पबजी गेमचा देखील समावेश होता.

चीनकडून सुरक्षेचा धोका पाहता भारताने अॅपवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला होता.पबजी ऑनलाईन गेम खेळणाऱ्यांसाठी एक निराशाजनक बातमी आहे. आजपासून देशात पबजी मोबाईल गेम आणि पबजी मोबाईल लाइट पूर्णपणे बंद होणार आहे.

त्यामुळे आता भारतात पबजी खेळता येणार नाहीये.भारतात पबजी पूर्णपणे बंद करत असल्याची माहिती कंपनीने फेसबुक पोस्टद्वारे दिलीये. ‘भारतातील पबजी मोबाइलला दिलेल्या प्रेमाबद्दल मनापासून आभारी.

टेन्सेंन्ट गेमकडून आज भारतातील सेवा संपुष्टात आली,’ असं या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
त्यामुळे आता जर तुम्ही मोबाईलमध्ये एपीके इन्स्टॉल केलं असेल तरीही आता पबजी गेम खेळता येणार नाही. सर्व प्रकाशित अधिकार पबजीच्या मालकांना परत करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here