केज जवळ झालेल्या आपघातात पोलीस कर्मचारी जागीच ठार….

0

वेगवान न्यूज /  केशव मुंडे

केज : भरधाव वेगात असलेल्या चारचाकी गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी उलटून झालेल्या अपघातात पोलीस कर्मचारी जागीच ठार झाल्याची घटना केज शहरापासून दोन किमी अंतरावर कळंब रोडवर (दि.28) रोजी सायंकाळी 6 वाजता सुमारास घडली.

    विवेकानंद विलास गिरी (अंदाजे वय 35 रा.केज) असे मयत पोलीस कर्मचार्‍याचे नाव आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, ते कळंब येथे उपविभागीय पोलीस अधिकारी, कार्यालय येथे कार्यरत होते. नोकरीनिमित्त चारचाकी गाडीने (क्र.एम.एच.44 एस 4302) ये-जा करत होते. नेहमीप्रमाणे प्रवास करत असताना गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी उलटली व त्यांचा गाडीखाली येऊन जागीच मृत्यू झाला. केज ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

पत्नीही युसूफवडगाव ठाण्यात कार्यरत

मयत विवेकानंद गिरी यांच्या पत्नी जयश्री गिरी ह्या युसूफवडगाव पोलीस ठाण्यात कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत, अशी माहिती केज पोलिसांकडून देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here