बीड पोलीसांचा पोद्दार पॅटर्न

0

वेगवान न्यूज / केशव मुंडे

बीड –

बीड जिल्ह्यास हर्ष पोद्दार पोलीस अधिक्षक म्हणून लाभल्यापासुण बीड पोलिसांनी कात टाकून जिल्ह्यातील जनतेचा विश्वास तर संपादन केलाच आहे.परंतु राज्यात हि बीड पँटर्ण, किंवा पोद्दार पँटर्ण, म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.

बीड जिल्ह्यातील पिंपळनेर येथील पश्चिम बंगालचे 12 मजूर हे पश्चिम बंगालसाठी नांदेडवरून सुटणाऱ्या 29 मे च्या रेल्वेने जाणार होते.पण नांदेड येथे जाणाऱ्या मजुरांच्या बस मधून हे राहून गेले होते. पिंपळनेर पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी पोलीस अधीक्षकांना कळविले. पोलीस अधीक्षकांनी तात्काळ प्रशासकीय समन्वय करून पोलीस वाहनांनी मजुरांना पूर्णा रेल्वे स्टेशनवर पोहोचवले.रेल्वेचा स्टॉप नसतानाही रेल्वे थांबवुन मजुरांना त्यांच्या स्वतःच्या घरी पोहोचण्यास बीड पोलिसांनी तत्परतेने मदत केली आसुण या कार्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here