ऑनलाइन गेम खेळत असताना सापडल्यास 2 वर्षांपर्यंत शिक्षा होणार ?

0

अमरावती l देशातील एका राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आंध्र प्रदेश सरकारने (Andhra Pradesh Cabinet) गुरुवारी चुकीच्या मार्गावर ढकलणाऱ्या रमी (Rummy) आणि पोकर (Poker) सारख्या ऑनलाइन गेम (Online Games) वर निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे.

सूचना मंत्री पी. वेंकटरमैया (नानी) यांनी सांगितले की, मुख्यमंत्री वाय एस जगन मोहन रेड्डी (YS Jagan Mohan Reddy) यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या मंत्रिमंडळाने (State Cabinet) ऑनलाइन सट्ट्यावर (Online Gambling) निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे.डेटा सुरक्षेच्या कारणास्तव केंद्र सरकारने चीनच्या पबजीसह 118 मोबाइल अॅप्सवर बंदी आणली. त्यानंतर निर्बंध लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय म्हणाले मंत्री ?

ऑनलाइन सट्ट्याच्या सवयीमुळे तरुणांचं लक्ष भटकवून त्यांना नुकसान पोहोचवत आहे. ते पुढे म्हणाले की, यासाठी आम्ही तरुणांना वाचविण्यासाठी अशा सर्व ऑनलाइन सट्ट्यावर निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार ऑनलाइन सट्ट्याच्या आयोजकांना पहिल्यांदा अपराधी आढळल्यास 1 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. ते पुढे म्हणाले की दुसऱ्यांना दंडासाह 2 वर्षांपर्यंत शिक्षा होईल. तर ऑनलाइन गेम खेळत असताना सापडल्यास 6 महिन्यांपर्यंत शिक्षा होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here