मागवला कॅमेरा, आल्या जुन्या चपला ! अॅमेझॉनवरून ऑनलाइन खरेदी केल्यानंतर काय घडलं !

0

नवी दिल्ली l ऑनलाइन शॉपिंग करतांना नेहमी सावधगिरी बाळगली पाहीजे अन्यथा आपलेल्या पण लाखोंचे नुकसान होऊ शकते. कोरोना महामारीत ऑनलाइन शॉपिंगचे प्रमाण काढले आहे. पण अशी शॉपिंग करताना सावधगिरी बाळगली नाही तर मोठा फटका ग्राहकाला बसू शकतो.

असाच एक धक्कादायक प्रकार राजधानीत घडला आहे. दिल्लीतील सुमित चौहान या ग्राहकाने 27 ऑगस्टला ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट अॅमेझॉनवरून 1 लाख 40 हजार रुपये किमतीचा महागडा कॅमेरा मागवला होता.

त्यासाठी त्यांनी क्रेडिट कार्डाने पैसेही भरले होते. पण कॅमेराचे पार्सल घरी आल्यावर ते उघडताच चौहान यांना धक्काच बसला. कारण त्या पार्सलमध्ये कॅमेऱ्याऐवजी जुन्या वापरलेल्या चपला आणि दगड भरलेला होता. अर्थात चौहान यांनी पार्सल अनबॉक्स करताना त्या प्रक्रियेचा व्हिडीओ चित्रित केला होता. त्यामुळे त्यांना अॅमेझॉनकडे या फसकणुकीची तक्रार करता आली अन्यथा त्यांना लाखो रुपयांवर पाणी सोडावे लागले असते.

अमेझॉनने या प्रकरणी ग्राहकाची माफी मागत पार्सलमध्ये कॅमेराऐवजी चप्पल आणि दगड कुणी भरला याची चौकशी सुरू केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here