या शिक्षकाला दिली जाणार कोरोनाची पहिली लस

0

नवी दिल्ली :  कोरोनावर एक लस येत आहे.  पुढील आठवड्यातया नव्या लसीची क्लिनिकल चाचणी होणार आहे. एका व्यक्तीवर या लसीची प्रयोग करण्यात येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे ज्या व्यक्तीला ही पहिली लस दिली जाणार आहे, त्या व्यक्तीची नाव पुढे आले असून त्याची निवड झाली आहे.

यात चिरंजीत धीबरचं नाव पुढे आलं आहे. पुढील आठवड्यात त्यांच्यावर क्लिनिकल ट्रायल होणार आहे, त्यासाठी त्यांना आयसीएमआरच्या भुवनेश्वर केंद्राला जावं लागेल.चिरंजीत धीबर हे एक शिक्षक आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार चिरंजीत धीबर यांनी एप्रिल महिन्यातच क्लिनिकल ट्रायल करण्यासाठी अर्ज दिला होता.संघाच्या प्रेरणेमुळे मी कोरोना व्हायरससाठी क्लिनिकल ट्रायलसाठी, माझं शरीर देशाला दान केलं आहे.चिरंजीत धीबर यांनी आपल्या फेसबूकवर या विषयी माहिती देताना म्हटलं आहे,

आरएसएसच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या महासंघाच्या कार्यकारिणीत ते  सदस्य असून जाणकारांच्या मते चिरजीत धीवर हे बंगालच्या दुर्गापूरमध्ये शिक्षक आहेत.

या लसीची माणसांवर चाचणी या महिन्यात होणार आहे, देशातील १२ केंद्रांवर या लसीची क्लिनिकल ट्रायल होणार आहे. आपल्या देशाची औषध निर्मिती करणारी कंपनी भारत बायोटेक ने आयसीएमआरसोबत मिळून कोरोना व्हायरसची लस बनवली आहे.

 ही लस भारतात कधी लॉन्च केली जाईल, सर्वांसाठी कधी उपलब्ध होईल याला किती उशीर होईल किंवा लवकर येईल, यावर वेगवेगळी मतं असली तरी सरकारकडून १५ ऑगस्टपर्यंत ही लस लॉन्च करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here