आरे वा!…या ग्राहकांना यूट्यूब प्रीमियम सबस्क्रिप्शन आता मोफत मिळणार…

0

नवी दिल्ली : एअरटेल युझरसाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल आता एअरटेल कंपणीने आपल्या वापरकर्त्यांना एअरटेल थँक्स अपद्वारे ३ महिने मोफत यूट्यूब प्रीमियम सबस्क्रिप्शन देत आहे.ऑफर मिळविण्यासाठी, वापरकर्त्यांना ‘मोर’ विभागात जाण्याची आवश्यकता आहे आणि त्याची उपलब्धता तपासण्यासाठी रिवार्ड्स निवडावं लागेल.

ही ऑफर सध्या निवडक वापरकर्त्यांसाठी मर्यादित असून 22 मे 2021 पर्यंत वैध आहे. यूट्यूब प्रीमियमसह, युझर्स जाहिरातीशिवायच व्हिडिओ, बॅकग्राऊंड प्लेबॅक पर्यायासोबतच यूट्यूब म्युझिक आणि यूट्यूब ओरिजिनल्सचाही लाभ घेऊ शकतात.परंतु एअरटेलने असंही सांगितलं की, यूट्यूब प्रीमियम सदस्यता केवळ नवीन यूट्यूब वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे आणि ज्यांच्या स्मार्टफोनमध्ये आधीपासून कोणत्याही योजना कार्यरत आहेत, त्यांना ही ऑफर मिळू शकत नाही.

युट्यूब म्युझिक प्रीमियम, यूट्यूब रेड किंवा गुगल प्ले म्युझिक सबस्क्रिप्शन असणारे युझर्स या ऑफरचा लाभ घेऊ शकत नाहीत, असं एअरटेलने आपल्या वेबसाइटवर सांगितलं आहे.एअरटेलची विनामूल्य यूट्यूब सदस्यता संपल्यानंतर, युझर्सकडून दरमहिन्याला 129 रुपये शुल्क आकारले जाईल. परंतु युझर्स त्याची वैधता संपण्यापूर्वी कोणत्याही शुल्काशिवाय विनामूल्य तीन महिन्यांची ही सदस्यता रद्द करू शकतात.

आपल्या एअरटेल थँक्स अपवर ही ऑफर दिसत नसल्यास, युझर्स एक फॉर्म भरून ट्रायल कोड मागवू शकतात, हे कोड दिसण्यासाठी सहा महिने सुद्धा लागू शकतात. युझर्सना यूट्यूब प्रीमियमवर साइन अप करण्यासाठी गुगल अकाउंटची देखील आवश्यकता असेल.यूट्यूब प्रीमियम सबस्क्रिप्शन व्यतिरिक्त, एअरटेलचे युझर्स कंपनीने देऊ केलेले काही कार्य पूर्ण करून एअरटेल थँक्स अपद्वारे नवीन बक्षीस मिळवू शकतात. जन्मतारीख, पसंतीची भाषा आणि यासारखी काही वैयक्तिक माहिती दिल्यानंतर गिफ्ट कूपन सारखे काही रिवार्ड्स देखील युझर्स मिळवू शकतात.

याचसोबत, एअरटेल आपल्या ब्रॉडबँड आणि पोस्टपेड ग्राहकांना एक वर्षासाठी विनामूल्य डिझनी हॉटस्टार व्हीआयपी सदस्यता देत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here