अरे वा! फेसबुकने नवीन मस्त फिचर केलं सुरु

1

मुंबई :

सोशल नेटवर्किंग वेबसाईट फेसबुकने भारतात एक नवं फिचर लाँच केलं आहे. Avatars असं या फिचरचं नाव आहे. यामध्ये फेसबुक युजर्स स्वत:सारखा दिसणार वर्च्युअल अवतार तयार करू शकतो. फेसुबकने हे फीचर अशावेळी लाँच केलं आहे जेव्हा भारत सरकारने टिकटॉकसहित ५९ चिनी अॅप्सवर बंदी घातली आहे.

फेसबुकने तयार केलेलं Avatars हे फिचर तुम्ही स्टिकर किंवा चॅटमध्ये वापर करू शकता. कंपनीने म्हटले आहे की, भारतात हे लाँच केलं आहे. लॉकडाऊनमुळे सध्या सोशल इंटरअॅक्शन वाढत आहे.

वतार फीचरच्या मदतीने युजरला फक्त एकदा त्यांचं अ‍ॅनिमेटेड कॅरेक्टर  डिझाईन करावं लागेल. त्यानंतर पोस्ट्स, प्रोफाईल फोटो किंवा मेसेन्जर चॅट विंडोमध्ये ते त्यांचा अवतार शेअर करु शकतील.

फेसबुक अवतार बनविण्याविषयी टिप्स

– सर्व प्रथम, तुम्हाला गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवर जाऊन फेसबुक अ‍ॅपचं नवीन व्हर्जन अपडेट करावं लागेल.

– त्यानंतर फेसबुक अ‍ॅप ओपन करा. वरच्या बाजुने उजव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या 3 लाईन असलेल्या ‘हॅमबर्गर’ ऑप्शनवर क्लिक करा.

इतर महत्वाच्या बातम्या 

मामी नाही तू झालीस वैरणी…काय केलं या बाईने….

कोविड -19 प्रसाराला आळा घालण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये टास्कफोर्स

– इथे स्क्रोल डाऊन केल्यानंतर See More ऑप्शनवर क्लिक करा. तिथे तुम्हाला जांभळ्या रंगात Avatars चा आयकन दिसेल.

– या Avatars च्या आयकनवर क्लिक करा

त्यानंतर तुम्हाला अवतार कस्टमाईज करण्याचं ऑप्शन मिळेल. यामध्ये तुम्हाला चेहऱ्याचा आकार आणि हेअरस्टाईलपासून ते तुमचे सर्व फीचर्स टाकावे लागतील.

अवतारसाठी तुम्हाला बॉडी शेप आणि कपडेही निवडावे लागतील.

– एकदा का तुम्ही कस्टमायजेशन पूर्ण केलं, त्यानंतर टॉप राईटमध्ये दिसणाऱ्या निळ्या रंगातील ‘Done’ ऑप्शनवर क्लिक करा.

– त्यानंतर हे अ‍ॅप्लिकेशन तुमचा नीवन अवतार जनरेट करेल, म्हणजेच तयार करेल. त्यानंतर तुम्हाला हा अवतार सोशल मीडियावर शेअर करण्याचं ऑप्शनही मिळेल.

– जर तुम्हाला हा अवातर फीडमध्ये शेअर करायाचा असेल तर तुम्ही ते करु शकता किंवा स्किपही करु शकता.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here