अरे देवा ! एअर इंडियाच्या विमानाने लंडनहून भारतात आलेले २० जण कोरोना पॉझिटिव्ह!

0

नवी दिल्ली l कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आला आहे.नवीन प्रकारच्या या कोरोना विषाणूच्या प्रसाराचा वेग प्रचंड आहे. हा नवा प्रकाराचा विषाणू 70 टक्के अधिक वेगाने पसरतो आणि म्हणूनच त्याला ‘सुपर स्प्रेडर’ असंही म्हटलं आहे.

भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होत असताना या विषाणूमध्ये बदल झाल्याचं समोर आल्याने चिंता पुन्हा वाढली आहे. कोरोनाच्या नव्या प्रकाराला रोखण्यासाठी भारतासह अनेक देशांनी ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांना बंदी घातली आहे.

नियोजित विमान काल देशात विविध ठिकाणी दाखल झाली. यातून आलेल्या प्रवाशांपैकी 20 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.भारत आणि ब्रिटनमधील विमानसेवा बुधवारपासून 31 डिसेंबपर्यंत बंद राहणार आहे.

मंगळवारी ब्रिटनमधून भारतात असंख्य प्रवासी दाखल झाले.ब्रिटन येथून येणाऱ्या प्रवाशांवर कठोर पाळत ठेवली जाणार आहे. आतापर्यंत आढळून आलेल्या 20 पॉझिटिव्ह लोकांमध्ये सोमवारी रात्री दिल्लीत लँड करणाऱ्या 6, रविवारी रात्री कोलकाता येथे येणाऱ्या 2, मंगळवारी अहमदाबाद येथे येणाऱ्या 4 आणि आज अमृतसरला आलेल्या एका क्रू मेंबरचा समावेश आहे. हे सर्व लोक एअर इंडियाच्या विमानाने लंडनहून भारतात आले होते.भारतात आतापर्यंत याप्रकारचा विषाणू आढळून आलेला नाही आणि त्याच्या स्वरुपातही कुठला महत्त्वपूर्ण बदल झालेला नाही.

निती आयोगचे सद्स्य काय म्हणतात –

ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोना विषाणुच्या नव्या स्वरुपाने लशीच्या विकासावर कुठलाही परिणाम पडणार नाही, असं निती आयोगचे सदस्य डॉ. व्ही के पॉल यांनी सांगितलं.

“आपण चांगल्या स्थितीत आहोत आणि आपण हाच वेग कायम ठेवला पाहिजे. यापुढेही सावधगिरी बाळगून विषाणूवर आळा घालता येईल. युकेमध्ये विषाणूमध्ये बदल झाल्याचं आढळून आलं आहे.”

ते पुढे म्हणाले, “युकेतील संशोधकांशी बोलल्यानंतर असं लक्षात आलं आहे की विषाणूमध्ये झालेल्या बदलामुळे त्यांची लागण होण्याची क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या विषाणूची संक्रमित करण्याची क्षमता 70% असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे हा विषाणू ‘सुपर स्प्रेडर’ बनल्याचं आपण म्हणू शकतो.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here