देवळा तालुक्यात करोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा ३ने वाढ; परिस्थिती चिंताजनक

0

वेगवान न्यूज/मनोज वैद्य

दहिवड(३० जून)  देवळा तालुक्यातील दिनांक २८जून रोजी आलेल्या अहवालात तालुक्यातील देवळा येथिल एक पुरुष जो नगरपालिका देवळा येथे वसुली विभागात कामाला आहे तो व खुंटेवाडी येथील मूळचा नाशिक येथून आपल्या मामाच्या गावाला आलेला १३ वर्षीय मुलगा करोना पॉझिटिव्ह आले होते.
त्या रुग्णांच्या जवळच्या संपर्कातील १३ व्यक्तींचे स्वॅब काल घेण्यात आले होते  त्यापैकी ७ अहवाल प्रशासनास प्राप्त झाले असून देवळा येथील रुग्णाच्या संपर्कातील ३ महिलांचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत तर ४ रिपोर्ट निगेटिव्ह व ६ रिपोर्ट येणे बाकी आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये  एक८०वर्षीय, एक ६५ वर्षीय व एक २७ वर्षीय  अशा ३महिलांचा समावेश आहेत. त्यामुळे तालुक्यात चिंता निर्माण झाली आहे. आज सकाळी गुंजाळनगर येथील एक ४५ वर्षीय व्यापारी करोना पॉझिटिव्ह आल्याने तालुक्याच्या चिंतेत भर पडली होती व आता पुन्हा ३ ने रुग्ण संख्या वाढल्याने तालुक्यातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुभाष मांडगे यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here