आता तुमची गाडी चोरी होण्यापासून वाचणार !

0

नवी दिल्ली l मोटारसायकल धारकांना बाजारात तसेच गर्दीच्या ठिकाणी इथे-तिथे गाडी पार्क करावी लागत असते. पण अशावेळी खरेदीपेक्षा अधिक लक्ष गाडीकडेच असतं. अनेकदा लॉक तोडून बाईक, स्कूटर चोरी होण्याची शक्यता असते.

मात्र बाजारात आता एक असं लॉक आलं आहे, ज्याने गाडी पूर्णपणे सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे.

कसं काम करेल हे लाॅक ?

ह्या लाॅकचे नाव ग्रिप लॉक आहे. हे लॉक स्टेनलेस स्टील-अलॉय मेटल आणि फायबरने तयार झालेलं असल्याने अतिशय मजबूत आहे. ग्रिप लॉक कोणतंही इलेक्ट्रॉनिक गॅजेट नाही, तर एक साधारण दिसणारं लॉक आहे.

जे चावीने उघडतं आणि बंद होतं. पण याची विशेष बाब म्हणजे हे सहजपणे तोडलं जाऊ शकत नाही, उघडलं जाऊ शकत नाही आणि कापलंही जात नाही. याचा आकारही छोटा असल्याने, सहजपणे कुठेही घेऊन जाता येऊ शकतं.याला दोन कम्पार्टमेंट देण्यात आले आहेत. एकात हँडलबारचं ग्रिप आणि दुसरं ब्रेक लिवरचं.

चावीच्या मदतीने उघडून यात असलेल्या कम्पार्टमेंटदरम्यान ग्रिप आणि ब्रेक ठेवा फोल्ड करुन, अनलॉक करा. हे उघडण्यासाठी केवळ 10 सेकंदाचा वेळ लागतो. लॉक झाल्यानंतर हे फ्रंट ब्रेकला दाबून ठेवतं. जर कोणी गाडी चोरण्याचा प्रयत्न केला, तर पुढचा ब्रेक दाबला असल्याने गाडी पुढे घेऊन जाता येणार नाही आणि एक्सिलेटरही वापरता येणार नाही.

ग्रिप लॉकची किंमत

हे लाॅक ब्रँडनुसार याच्या किंमती वेगवेगळ्या आहेत.ई-कॉमर्सवर सर्वात स्वस्त ग्रिप लॉक 779 रुपयांचं आहे. तर 9500 रुपयांचं हँडलबार ग्रिप लॉकही उपलब्ध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here