आता तुम्ही स्वतःच करू शकतील, स्वतःची कोरोना चाचणी l जाणून घ्या सविस्तर माहिती

0

बोस्‍टन – कोरोना जगभरात थैमान घालत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी वैज्ञानिक नवनवीन टेक्निक्स शोधून काढत आहेत.

कोरोना विषाणू ने जगभर थैमान घातले असून यातच कोरोनावर लस तयार करण्यासाठी वैज्ञानिक रात्रंदिवस काम करत आहे.आता वैज्ञानिकांनी एक नवी रॅपिड टेस्ट विकसित केली आहे.

कमितकमी उपकरणांसह ही टेस्ट केली जाऊ शकते आणि केवळ तासाभरातच या टेस्टचा निकालही समोर येऊ शकतो.यासंदर्भात बोलताना अमेरिकेतील मसाच्यूसेट्स इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या (एमआइटी) संशोधकांनी सांगितले, स्टॉप कोविड नावाची ही टेस्ट एवढी किफायतशीर बनवली जाऊ शकते, की लोक रोज स्वतःच स्वतःची टेस्ट करू शकतील.

‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’ ने प्रसिद्ध केलेल्या एका अध्यनानुसार, या नव्या टेस्टचा रिझल्ट 93 टक्के एवढा आहे.तब्बल 402 रुग्णांच्या स्वॅब नमुन्यांवर या टेस्टचा प्रयोग करण्यात आला.

सशोधक सध्या लाळेच्या सहाय्याने स्टॉप कोविडचे परीक्षण करत आहेत. या पद्धतीने घरच्या घरीच टेस्ट करणे सोपे होईल. वैज्ञानिकांनी म्हटले आहे, की ‘ लोकांना रोजच्या रोज स्वतःची टेस्ट करता यावी यासाठी, या घडीला रॅपिड टेस्टिंगची आवश्यकता आहे.

यामुळे कोरोनावर अंकुश ठेवण्यास मदत मिळेल.’ही टेक्निक विकसित करणाऱ्या वैज्ञानिकांनी आशा व्यक्त केली आहे, की क्लिनिकल, फार्मसी, नर्सिग होम आणि शाळांना डोळ्यासमोर ठेऊन या टेस्टला अधिक विकसित बनवले जाऊ शकते.

एमआयटीच्या संशोधक जुलिया जोंग म्हणाल्या, ‘आम्ही स्टॉप कोविड टेस्ट विकसित केली आहे. ही टेस्ट लॅब शिवाय बाहेर सामान्य माणूसही करू शकतो.’या पद्धतीने 93 टक्के रुग्णांची ओळख पटवता येऊ शकते. पारंपरीक पद्धतीच्या तपासनीचा दरही हाच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here