आता तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या फोनमधील फोटो, व्हिडिओ करता येणार Delete

0

नवी दिल्ली l WhatsApp वापराचे प्रमाण जगभरात वाढले आहे. तसेच भारतातही मोठ्या प्रमाणात WhatsApp चे युजर्स आहेत. WhatsApp ने आता एक नवे फीचर लाँच केले आहे. एखाद्या व्यक्तीला पाठवलेले चॅटवरील फोटो, व्हिडीओ आणि जीफ फाइल्स पाठवल्यानंतरही डिलीट करता येणार आहे. म्हणजेच अगदी सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास चॅट करताना मिडिया फाइल्स पाठवल्यानंतर आणि त्या डिलेव्हर झाल्यानंतरही समोरच्या व्यक्तीच्या फोनमधील या फाइल्स डिलीट करण्याची सोय व्हॉट्सअ‍ॅप उपलब्ध करुन देणार आहे.

या फिचरला एक्पायरिंग (म्हणजेच नष्ट होणारं) मिडिया फिचर असं म्हटलं जात आहे. व्हॉट्सअ‍ॅप संदर्भातील माहिती देणाऱ्या वाबिटाइन्फो या वेबसाईटला सर्वात आधी हे फिचर आढळून आल्याचे द इन्डीपेंडण्टने म्हटलं आहे. चॅटमध्ये मिडिया मेसेज पाहून झाल्यानंतर तो गायब होणारे हे फिचर आहे.
एक्पायरिंग मिडिया फिचर वापरण्यासाठी फोटो, व्हिडिओ आणि जीफ चॅट मेसेजमधून पाठवताना ‘व्ह्यू वन्स’ हा पर्याय निवडावा लागणार आहे.

हा पर्याय निवडून पाठवलेल्या फाइल्स समोरच्या व्यक्तीला केवळ चॅट करताना एकदाच दिसतील. चॅट विंडो बंद केल्यानंतर हे मेसेज आपोआप डिलीट होती. “चॅट विंडो सोडल्यावर ही फाइल नष्ट होइल,” असा नोटीफिकेशनसहीत हे चॅट दिसतील. चॅट विंडोवर पुन्हा आल्यास पॉप अप नोटिफिकेशनच्या माध्यमातून, “व्ह्यू वन्स फोटो एक्पायर्ड” असं युझर्सला नोटीफाय केलं जाईल.

विशेष म्हणजे या चॅटचे स्क्रीनशॉर्ट काढता येणार नाहीत.व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन अ‍ॅण्ड्रॉइड २.२०.२०११ व्हर्जनमध्ये हे नवीन फिचर असल्याचे सांगितले जात आहे. सध्या या फिचरवर काम चालू असून व्हॉट्सअ‍ॅपच्या बिटा व्हर्जनवर त्याच्या चाचण्या सुरु आहेत. मात्र सर्व सामान्यांना हे फिचर कधी वापरता येईल यासंदर्भातील निश्चित तारीख सांगण्यात आलेली नाही. सामान्यपणे एखादे फिचर आणताना व्हॉट्सअ‍ॅप ते काही महिन्यांसाठी मर्यादित बिटा व्हर्जन युझर्सला वापरण्यासाठी देते.

त्यानंतर त्यामध्ये वेळोवेळी सुधारणा करुन अंतिम अपडेटेड फिचर युझर्सला वापरायला मिळते. जगभरामध्ये २०० कोटींहून अधिक अ‍ॅक्टीव्ह युझर्स असलेले व्हॉट्सअ‍ॅप हे जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. त्यामुळेच फेसबुकच्या मालकीच्या मेसेजिंग अ‍ॅपमध्ये नवीन फिचरचा समावेश करताना अधिक वेळ लागतो. कारण नवीन फिचरचा समावेश करताना त्यामध्ये बग (तांत्रिक अडचण) आल्यास त्याचा परिणाम सर्वच युझर्सवर होतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here