मुंबई l कोरोना विषाणूचा विळखा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.देशात अनेक लाखो लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.यात बॉलिवूड कलाकारांचाही सामावेश आहे. आता अभिनेत्री सारा खान लाही कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत तिने इंस्टाग्रामवर पोस्ट करत सांगितले आहे.
दरम्यान, कनोनाचा प्रसार सुरु झाल्यानंतर सर्वाधिक चर्चा झाली गायिका कनिका कपूरची. करोनाची लागण झालेली ती पहिली सेलिब्रिटी होती. तिचे तब्बल पाच रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. उपचारानंतर आता ती बरी होऊन घरी परतली आहे.
साराने काय पोस्ट केलं.
सारा ने पोस्ट केली आहे की, ‘मला कोरोनाची लागण झाली आहे. मी स्वतःला क्वारंटाईन करून घेतलं आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने माझ्यावर उपचार सुरु आहेत. तुम्ही सगळे काळजी घ्या आणि सुरक्षित रहा.’ अशा आशयाची इन्स्टाग्राम पोस्ट लिहून सारा खानने करोना झाल्याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली.
abe headline la photo konacha aani corona jhala kunala……….saala mhanun hai bhangar chanel koni baghat nahi…….jara kahi tar laaz theva