आता कोरोनाची लागण झाल्यास पैसे मिळणार ?

0

नवी दिल्ली –

कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळे मार्ग अवलंबत आहे. अशावेळी आपल्यासाठी एक अनोखी योजना येत आहे. त्याअंतर्गत जर तुम्ही

आता आपल्यासाठी एक अनोखी योजना येत आहे. कोरोना विषाणू पॉझिटिव्ह आढळले तर विमा कंपनी तुम्हाला पैसे देईल. लवकरच यासंदर्भात बाजारात नवीन विमा योजना येऊ शकेल.कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळे मार्ग अवलंबत आहे.

कसा असणार कोविड विमा ?

सर्व विमा कंपन्यांना कोरोनासंबंधित विमा नियामक आयआरडीएआयने फिक्स्ड बेनिफिट कोविड विमा सुरू करण्यास सांगितले आहे. सर्व कंपन्यांना 30 जून पर्यंत ही विमा योजना सुरू करण्यासाठी सांगण्यात आले आहे. या विम्यानुसार कुणीही कोरोना पॉझिटिव्ह असल्यास विमा कंपन्यांद्वारे निश्चित रक्कम दिली जाईल.

कसी असणार विम्याची प्रीमियम रक्कम

आयआरडीएआयने कोरोना संक्रमणासाठी बाजारात विमा योजना सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु या विम्याचे प्रीमियम निश्चित करण्याचा निर्णय कंपन्यांकडे सोडण्यात आला आहे.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की ग्राहकांना 50 हजार ते 5 लाखांपर्यंत विम्याची रक्कम मिळू शकते. कोरोना संसर्ग पाहता 15 दिवस प्रतीक्षा कालावधीचा नियम लागू होऊ शकतो. हे लक्षात घेण्यासारखे आहे की कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात विमा कंपन्यांनी सध्याच्या आरोग्य विम्यावर प्रीमियमची रक्कम 20 टक्क्यांनी वाढविली आहे.

टर्म इन्शुरन्सच्या बाबतीतही कंपन्यांनी प्रीमियमची रक्कम वाढविली आहे. विमा कंपनी गृहीत धरते की दरवर्षी 10,000 लोकांना विमा मिळतो त्यापैकी तीन लोक कोणत्या ना कोणत्या कारणामुळे मरतात. पण गेल्या महिन्यांत ही सरासरी बदलली आहे. अशा परिस्थितीत मृतांचा आकडा वाढल्यामुळे विमा कंपन्यांवर प्रचंड ओझे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here