सुशांतची हत्या नव्हे, आत्महत्या ! एम्सच्या टीमने सीबीआयकडे सोपवला अहवाल

0

नवी दिल्ली l बॉलिवूडचा अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची हत्या झाली नसून त्याने आत्महत्या केली आहे, असा निष्कर्ष एम्सचे डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी काढला आहे. त्यामुळे त्याला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले का, यादृष्टीने सीबीआय तपास करणार असल्याचे सांगण्यात आले. एम्सच्या फॉरेन्सिक टीमने याबाबतचा अहवाल सीबीआयला सुपूर्द केला.

एम्सच्या पॅनेलचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांतच्या शरीरावर गळफासाशिवाय इतर कोणत्याही जखमा नव्हत्या. तसेच शरीर आणि कपडयांसोबत कोणतीही झटापट झालेली दिसली नाही.

मुंबई टॉक्सिक सायन्स लॅब तसेच एम्स टॉक्सिकोलॉजी लॅबच्या अहवालात सुशांतच्या शरीरात कोणतेही विषारी पदार्थ आढळले नाहीत. गळ्यावर असलेला डाग हा गळफासामुळे होता, असेही डॉ. गुप्ता यांनी सांगितले. 14 जून रोजी सुशांतचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मुंबईतील कूपर रुग्णालयात त्याचे पोस्टमार्टम करण्यात आले होते.

या पोस्टमार्टम अहवालात सुशांतच्या मृत्यूचे कारण गळफास घेतल्यामुळे श्वास गुदमरून झाला असल्याचे सांगण्यात आले होते. याच अहवालावर एम्सच्या पॅनेलने सहमती दर्शवल्याचे डॉ. गुप्ता यांनी सांगितले.

सुशांतच्या आत्महत्येचे नेमके कारण काय? त्याला आत्महत्येला कुणी प्रवृत्त केले आहे का, याचा शोध घेण्यात येईल.एम्सच्या डॉक्टरांनी दिलेल्या अहवालामुळे सीबीआयच्या तपासाची दिशा बदलणार आहे. सीबीआय सुशांतचा मृत्यू आत्महत्येमुळे झाल्याचे समोर ठेवून पुढील तपास करू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here