घाबरण्याची गरज नाही – दिल्ली कोरोनाच्या चार पावलं पुढे आहे? अरविंद केजरीवाल यांचा दावा

दिल्लीमध्ये कायमचा लॉकडाउन ठेऊ शकत नाही, असं मत अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केलं आहे

0

नवी दिल्ली –

अरविंद केजरीवाल म्हणतात दिल्ली कोरोनाच्या चार पावलं पुढे आहे.तसेच दिल्लीमध्ये कायमचा लॉकडाउन ठेऊ शकत नाही, असं मत अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केलं आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचं मान्य आहे.

पण आपण घाबरण्याची गरज नाही. कोरोनाबिधित रुग्णांच्या मृत्यूसंख्येत वाढ झाली आणि रुग्णालयातील बेडची कमतरता भासू लागली तरच दिल्लीमधील परिस्थिती माझ्यासाठी चिंताजनक असेल, असं अरविंद केजरीवाल यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगदरम्यान सांगितलं आहे.कायमचा लॉकडाउन हा पर्याय नाही. काळजी घेत आपल्याला पुढील वाटचाल करावी लागणार आहे, असं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे.

कोरोनाची परिस्थिती हाताळण्यावरुन टीका करणाऱ्यांना उत्तर देताना अरविंद केजरीवाल यांनी हे घाणेरडं राजकारण करण्याची वेळ नाही, देशासाठी आपण सर्वांनी एकत्र काम केलं पाहिजे, असं आवाहन केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here