कामाची बातमी ! सिलेंडर देणारा जर काळाबाजार करत असेल तर ‘इथं’ करा तक्रार, !

0

नवी दिल्ली l आता डिलिव्हरी मॅन तुम्हाला कमी गॅस देत असेल तर तुम्ही ताबडतोब तक्रार करू शकता. मागील महिन्यात मोदी सरकारने ग्राहक संरक्षण कायदा 2019 लागू केला आहे. हा कायद लागू झाल्यानंतर जर ग्राहकाला कमी गॅस मिळत असेल तर गॅस एजन्सीवर कारवाई होईल, शिवाय त्यांचे लायसन्स रद्द होऊ शकते.

एलपीजीचा काळाबाजार रोखण्यासाठी मोदी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. सध्या गॅस डिलिव्हरीच्या वेळी ग्राहकाला आलेला मॅसेज डिलिव्हरी मॅनला सांगणे अनिवार्य केले आहे. यानंतरच सिलिंडर मिळतो. जर तुम्ही गॅस सिलेंडर लवकर संपण्याच्या समस्येने त्रस्त असाल, तर आता तुमची समस्या लवकर दूर होऊ शकते.आता सिलेंडर लवकर संपण्याची तक्रार एजन्सीमध्ये करूनही कारवाई होत नसेल तर तुम्ही थेट ग्राहम फोरममध्ये तक्रार करू शकता. एक महिन्याच्या आत तुमची तक्रार सोडवली जाईल. नवीन ग्राहक कायद्यात गॅस ग्राहकांची फसवणूक केल्यास कडक कारवाईची तरतूद आहे.

जागरूकतेचा अभाव असल्याने अनेकदा कमी गॅसचे नुकसान ग्राहकांना सोसावे लागते. देशातील वेगवेगळ्या भागात गॅस सप्लायदरम्यान गॅस कमी मिळण्याच्या तक्रारी सातत्याने येत असतात. या गोष्टीचा नेहमीच खुलासा होत असतो की, सिलेंडरमधील दोन ते तीन किलो गॅस काढला जातो. आता ग्राहक संरक्षण कायदा 2019 लागू झाल्यानंतर ग्राहकांना घर बसल्या अनेक अधिकार आणि सुविधा मिळाल्या आहेत. आवश्यकता आहे त्याचा योग्यवेळी त्याचा वापर करण्याचा.

बहुतांश लोक डिलिव्हरीच्या वेळी सिलेंडचे वजन करत नाहीत, तशी सोयदेखील नसते. डिलिव्हरी मॅनसुद्धा वजनकाटा सोबत ठेवत नाही. याचा फायदा डिलिव्हरी मॅन घेतात. परंतु, आता यासंदर्भात तक्रार केल्यास कारवाई केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here