अखेर भारताच्या क्षेत्राला नकाशात दाखवण्याचा प्रस्ताव नेपाळकडून मागे ! काय आहे प्रकरण?

0

काठमांडू –

नेपाळने भारताच्या हद्दीतील काही भाग आपल्या नकाशात दाखवल्यानंतर दोन्ही देशांमधील एकूणच सर्व संबंध बिघडल्याचं दिसलं. त्यामुळे याच्या परिणामांचा अंदाज घेऊन नेपाळने एक पाऊल मागे घेतलं आहे. नेपाळने संबंधित विवादित भाग आपल्या नकाशात दाखवण्याचा प्रस्ताव सध्या मागे घेतला आहे.भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांमध्ये सुरु असलेल्या वादग्रस्त नकाशाच्या वादात नेपाळने अखेर माघार घेतल्याचं पाहायला मिळालं आहे

नेपाळने भारतासोबत बिघडलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर ऐनवेळी संसदेच्या कामकाजातून नकाशासंबंधित प्रस्ताव काढून टाकला. त्यामुळे विवादित भाग नेपाळच्या नकाशात समाविष्ट करण्याचा विषय मागे पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नेपाळ सरकारकडून नेपाळच्या नव्या नकाशाला त्यांच्या संविधानात समाविष्ट करण्यासाठी काल (27 मे) प्रस्ताव सादर करण्यात येणार होता. मात्र नेपाळमधील सत्ताधारी पक्ष‌ आणि विरोधी पक्ष अशा दोन्ही प्रमुख पक्षांच्या परस्पर सहमतीने नकाशातील बदलाचा प्रस्ताव संसदेच्या कामकाजातून वगळण्यात आला आहे. मंगळवारी (26 मे) नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी नवा नकाशा तयार करण्याविषयी सर्व सहमती असावी म्हणून नेपाळमध्ये तेथील सर्वपक्षीय पक्षांची बैठक बोलावली होती. यात सर्वच पक्षांच्या नेत्यांनी भारतासोबत चर्चा करुन कोणताही विषय सोडवण्याचा सल्ला दिला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here