नाशिक : येवला तालुक्यात खळबळ l विहिरीत आढळला महिलेचा मृतदेह…

0

वेगवान न्यूज / हितेश दाभाडे

येवला l बोकटे येथे बुधवार दि.२८ आक्टोंबर रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास कोळगंगेच्या किनाऱ्यावर विहिरीत महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सदर महिलेची ओळख झाली असुन सायगाव येथील मेंढपाळ करणाऱ्या मुक्ताबाई दत्तात्रय भालेराव अंदाजे वय ३१ हल्ली मुकाम अंदरसुल,ह्या आपल्या कुटुंबासह बोकटे परिसरात मेंढपाळ व्यवसाय करत असून बोकटे येथील कोंबडवाडी शेजारीच तात्पुरत्या स्वरूपात पाल तयार करून राहत असून बोकटे पोलीस पाटील सुरेश दाभाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार येवला ग्रामीण प्रभारी पी.आय.भिसे,ए.पी.आय.रजपूत यांच्यासह ए.पी.आय.तांदाळकर पो.हवालदार पगार पोलीस पाटील घटनास्थळी दाखल झाले व त्या महिलेस ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीतुन बाहेर काढले,

मृत्यू देहला येवला ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आले आहे.येवला पोलिसांनी आकस्मित मृची नोंद केली असून सदर घटनेचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नसून पुढील तपास येवला ग्रामीन पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here