नाशिक – 17 हजारांची लाचेची मागणी करतांना तलाठी एसीबीच्या जाळ्यात…

0

नाशिक l जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात तक्रारदार यांच्याकडे तलाठी गणी शेख यांनी १७२५० रूपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तलाठी गणी शेख यांच्यावर कारवाई केली आहे.

सविस्तर वृत्त असे की, यातील तकारदार यांच्या मालेगांव येथील गट क्रमांक २५४/५४ या जागेच्या ७/१२ उतारा-यावर औदयोगीक वापर अशी नोंद करून ७/१२ उतारा देण्याकरीता आलोसे शरीफ गणी शेख, तलाठी, मालेगाव,जि.नाशिक यांनी तकारदार यांच्याकडे १७,२५०/-रूपये लाचेची मागणी केल्यामुळे तकारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक कार्यालयात तकार दिल्याने सदर तक्रारीवरुन दि. १६/०९/२०२० रोजी ला.प्र.वि.नाशिक पथकाचे सापळापुर्व पडताळणी दरम्यान आलोसे शरीफ गणी शेख, तलाठी, मालेगाव, जि.नाशिक यांनी तक्रारदार यांचेकडून पंचसाक्षीदारांसमक्ष १७,२५०/- रूपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचेविरुध्द किल्ला पोलीस स्टेशन,मालेगांव,जि.नाशिक ग्रामीण येथे गु.र.नं. ३०९/२०२०, लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम १९८८ (संशोधन सन २०१८) चे कलम ७ प्रमाणे आज दि.२९/०९/२०२० रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here