नाशिक – ग्रामीण भागालाही लागली दृष्ट ! बाधित युवकामुळे गावात चिंतेचे वातावरण !

0

वेगवान न्यूज / उत्तम गायकर

इगतपुरी l तालुक्यातील वाघेरे येथे ३५ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला असुन आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे .

विशेष म्हणजे बाधित रुग्णास आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजताच शासकीय यंत्रणेच्या भरवश्यावर न राहता स्वतः उपचारार्थ दवाखान्यात दाखल झाला. बाधित रुग्णाच्या घराभोवतालचा परिसर सील करण्यात आला आहे .

संबंधित रुग्णाशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधला असता मी तंदुरुस्त आहे .तरी प्रत्येकाने काळजी घ्या .असे सांगितले .याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ .देशमुख, डॉ .प्रिती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यकर्मचारी, आशा वर्कर , अंगणवाडी ताई, ग्रामसेवक याबरोबरच शाहीर उत्तम गायकर यांनी कोरोना विषयी प्रबोधन करुन प्रत्त्येकाने “मीच माझा रक्षक” या न्यायाने काळजी घेण्याचे आवाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here