नाशिक – धक्कादायक ; देवळा तालुक्यात कोरोनाचा पहिला बळी !

0

वेगवान न्यूज / मनोज वैद्य

दहिवड l देवळा तालुक्यात कोरोनाने पहिला बळी घेतला असून देवळा शहरातील एक ७० वर्षीय महिलेला कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागल्याने देवळा शहरात व तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, देवळा शहरातील नीम गल्ली येथील ७० वर्षीय महिला ३० जून रोजी कोरोना बाधीत आढळून आली होती त्या बाधीत महिलेला त्याच दिवशी नाशिक येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

काल १० जुलै शुक्रवारी उपचारादरम्यान त्या बाधीत महिलेचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. तरी नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करून दक्षता घेण्याचे आवाहान वेगवान न्यूज करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here