नाशिक – सटाणा सहाय्यक निबंधक कार्यालयात रयत क्रांती शेतकरी संघटनेकडून ठिय्या आंदोलन

0

वेगवान न्यूज / गणेश सोनवणे
सटाणा l कोराणा रोगामुळे व शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी आत्महत्येच्या दारात उभा आहे त्याचे परिणाम गेल्या तीन महिन्यात १२०५ शेतकयांनी महाराष्ट्रात आत्महत्या केल्या आहेत . तरी शासन शेतकरी विरोधी धोरण बदलण्यास तयार नाही त्यामुळे सहाय्यक निबंधक कार्यालयात रयत क्रांती संघटनेने दोन तास ठिय्या देत आंदोलन केले, व यावेळी खालील ठळक आठ मुद्यांचे सहाय्यक निबंधक महेश भडांगे यांना निवेदन देण्यात आले,

१ ) महाराष्ट्र शासनाने शेतकरी कर्जमुक्त केलेल्या शेतकऱ्यांना कोणतीही बँक कर्ज देत नाही त्या शेतकऱ्यांना खरीपसाठी पिककर्ज त्वरीत मिळावे .
२ ) महाराष्ट्र शासनाने महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेची दि . ०१/०४/२०१५ तारखेपासुन कर्जमुक्ती ठरविण्यात आली आहे ती आजपावेतो कुठल्याही शेतकयाच्या कर्ज खात्यात जमा नसल्याने …. खरीपाची कर्ज मिळाले नाही तरी त्यांना पीक कर्ज लवकरात लवकर मिळावे .
३ ) मागील मा . फडवणीस शासनाने महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेत बरेच शेतकरी कर्जमुक्ती पासून वंचीत आहेत . अशा थकबाकी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती होण्यासाठी मा . ठाकरे शासनाने ०१/०६ २०० ९ पासून थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करावे .
४ ) मका हमीभाव केंद्रात बारदान उपलब्ध नसल्यामुळे संथ गतीने खरेदी चालू आहे त्याचा वेग वाढवावा .
५ ) ज्या शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्रासाठी पिकाची ऑनलाइन नोंद केलेली आहे . अशा शेतकऱ्यांचा सर्वच मका कापूस खरेदी करावा व शासनातर्फे नोंद केलेल्या शेतकऱ्यांच्या मका / कापूस खरेदी होत नसेल तर त्या शेतकयांना शासनाच्या हमीभावानुसार मोबदला बँक खात्यात द्यावा .
६ ) राष्ट्रीयकृत बँकांनी आजपावात शेतकऱ्याचे पीक कर्ज रेन्युवल करुन परत खरीपासाठी कर्जपुरवठा करीत नाहीत अशा बँकां वरती शासनाने कठोर कार्यवाही करावी .
७ ) विद्युत महामंडळाने ग्रामिण भागात अव्वाच्या सव्वा विजबिले दिलेली आहेत ते शासनाने स्वत : च्या तिजोरीतून भरावेत .
८ ) नाशिक जिल्ह्यात व महाराष्ट्रात कांद्याचे दर खुप कमी होत आहेत . त्या दराने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघत नाही त्यामुळे शासनाने मध्य प्रदेशच्या धर्तीवर शेतकऱ्यांना त्वरीत अनुदान व शासनाने निर्यातीस प्रोत्साहन द्यावे .
अशा आठ मागण्यांची शासनाने दखल घ्यावी नाहीतर रयत क्रांती शेतकरी संघटना रस्त्यावर उतरुन मोठे आंदोनल उभे करेल व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ,असे निवेदनात म्हटले आहे,
यावेळी रयत क्रांती शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विशाल पवार, राज्य सरचिटणीस डोंगर पगार, राज्य कार्यकारणी सदस्य दिपक पगार, शेतकरी भिका बापू धोंडगे, रमेश अहिरे, मधुकर पगार, शरद लोटन पगार, नरेंद्र पगार, विशाल धोंडगे, चिंतामण शिरोळे, ज्ञानेश्वर पगार, विरेंद्र पगार, उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here