नाशिक – राजुर बहुला येथे कुजलेल्या अवस्थेत मिळाला तरुणांचा मृतदेह !

0

इगतपुरी l राजुर बहुला येथील आशिष शहा यांचे पडीत क्षेत्र गट क्रमांक १९/१अ मधील पत्र्याच्या शेडमागे एक पुरुष जातीचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत पडलेले होते. 

तेथील जाणाऱ्या येणाऱ्या माणसांनी बघून सदरची खबर ही विलास निवृत्ती चौधरी कामगार पोलीस पाटील राजूरला यांना कळविली असता  सदर खबर त्यांनी वाडीव-हे पोलीस ठाणे यांना कळविली.घटनास्थळी वाडीव-हे पोलीस त्वरित पोहचून स्थळ पंचनामा करून वाडीव-हे पोलीस ठाण्यात अ. मृ.र.नं.३३/२०२०  सी.आर.पी.सी. १७४ प्रमाणे आकस्मात मृत्यू म्हणुन नोंद केली असून सदर अनोळखी  ,बेवारस इसम वय अंदाजे ३५ ते ४० वर्ष असा नोंदविण्यात आला आहे.सदर इसम शरीराने मजबूत, उंची ५:५ फूट, रंगाने निमगोरा ,संपूर्ण शरीर कुजलेल्या अवस्थेत आहे .

उजव्या व डाव्या हाताचा पंजाचे जंगली प्राण्यांनी लचके तोडले असून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे .  अनोळखी इसमाची ओळख पटवून त्याचे नातेवाइकांनी वाडीव-हे पोलिस ठाणे यांच्याशी ०२५३ /२३६५३३ यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे .

सदरच्या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन पाटील, पोलिस नाईक गायकवाड अधिक तपास करीत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here