शरद पवार म्हणतात…शेतकऱ्यांनी कांदाप्रश्नी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नये !

0

नाशिक l नाशिकमध्ये आज शरद पवारांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी कांदाप्रश्नी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नये; असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं आहे. ते नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

बाजारातील चढ-उतार याची सर्वाधिक झळ कांद्याला बसते. दोन व्यापारी प्रतिनिधी, दोन शेतकरी प्रतिनिधी यांना घेऊन केंद्रातल्या संबंधित मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचंही शरद पवारांनी सांगितलं आहे.

राज्यात कांदा व्यापाऱ्यांवर केंद्राच्या सांगण्यावरून धाडी टाकण्यात येत आहेत. राज्याचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी निर्यातबंदी आणि आयातीचा निर्णय केंद्रीय पातळीवरच होत असल्याचंही निदर्शनास आणून दिलं.

कांद्याची चर्चा झाल्याशिवाय नाशिकला आलं असं वाटत – शरद पवार

कांद्याची चर्चा झाल्याशिवाय नाशिकला आलं असं वाटत नाही. शेतकरी कष्टाने उत्पादन घेतात. प्रमाण आणि दर्जा या दोन गोष्टींमध्ये नाशिकचा पहिला क्रमांक आहे.बाजारातील चढ उतार याची झळ कांद्याला सर्वाधिक बसते असे मत शरद पवार यांनी यावेळी मांडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here