नाशिक – लासलगाव कोविड सेंटरमधून ७ कोरोना बाधित रुग्णांची घरवापसी

0

वेगवान न्यूज / समीर पठाण
लासलगाव l कोरोनावर मात करत लासलगाव कोविड सेंटरमधून ७ कोरोना बाधित रुग्णांनी घरवापसी केली आहे. निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील ५ तर चांदोरी येथील दोघांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला.

निफाड तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १०१ वर पोहचली असून यातील ४५ जणांनी कोरोनावर मात करत आजपर्यंत घरवापसी केली आहे. ११ कोरोना बधितांचा मृत्यू झाला असून ४५ जनांवर लासलगाव ,पिंपळगाव आणि नाशिक येथील शासकीय तसेच खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ चेतन काळे यांनी दिली.

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात स्थापित केलेल्या कोवाड केअर सेंटर मधून रविवारी सात रुग्णांना घरी सोडण्यात आले या प्रसंगी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ सूर्यवंशी ,कोविड केअर सेंटरचे प्रमुख डॉ राजाराम शेंद्रे, डॉ बाळकृष्ण अहिरे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here