नाशिक – लासलगाव येथे कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने उडाली खळबळ !

0

वेगवान न्यूज / समीर पठाण

लासलगाव l तिसऱ्यांदा कोरोनामुक्त झालेल्या लासलगावात पुन्हा कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे तब्बल एक महिन्यानंतर सर्वे नंबर 93 येथील 40 वर्षीय महिला कोरोना बाधित सापडल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.

नाशिक येथील सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महिलेचा शनिवारी संध्याकाळी आलेल्या कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह अहवाल आल्याने लासलगाव येथील कोरोना बधितांची संख्या पाच झाली आहे.

यातील 4 जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात करत घरवापसी केली आहे या कोरोना बाधित महिलेवर नाशिक येथे उपचार सुरू आहे आज दिवसभरात निफाड तालुक्यात 7 जनांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे लासलगाव 1 ,निमगाव वाकडा 1 , विंचूर 3 तर पिंपळगाव बसवंत 2 असे रुग्ण कोरोना बाधित सापडले आहे.लासलगाव मध्ये पुन्हा कोरोना रुग्ण सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.मात्र प्रशासना तर्फे भीती न बाळगता काळजी घेण्याचे आव्हान करण्यात आले

कोरोना बधितांची संख्या दररोज वाढ असल्याने लासलगाव येथील कोविड सेंटरची मर्यादा संपल्याने लासलगाव येथील डॉक्टर संगीता सुरसे यांनी त्यांच्या रूग्णालयातील खाटा उपलब्ध करून दिल्याने तेरा रुग्णांची मर्यादा असलेल्या रुग्णालयात वीस मर्यादा झाली मात्र वाढत्या कोरोना बधितांची संख्या वाढल्याने कोविड सेंटर आता हाउसफुल झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here