नाशिक – रखडलेले वेतन मिळून देण्यासाठी चांदवड तालुक्यातील शिक्षिकेकडे शिक्षण अधिका-यांनी मागितली लाच !

0

नाशिक –

उप शिक्षण अधिकारी, वर्ग-२, ( माध्यमिक विभाग) जिल्हा परिषद नाशिक कार्यालयातील अधिकारी भाऊसाहेब तुकाराम चव्हाण यांना ६,०००/- रूपयाची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.

यातील तकारदार यांची पत्नी चांदवड तालुक्यातील जि.प.उर्दु प्राथमिक शाळा येथे प्राथमिक शिक्षिका
म्हणून नेमणुकीस असतांना सदर कालावधी दरम्यान भाऊसाहेब तुकाराम चव्हाण उप शिक्षण अधिकारी, वर्ग-२, (माध्यमिक विभाग) जिल्हा परिषद नाशिक कार्यालय, हे गटशिक्षण अधिकारी या पदावर कार्यरत होते.

तक्कारदार यांचे पत्नीची सुधारीत वेतन निश्चिती होवून सुध्दा डिसेंबर २०१९ पासून तिला वेतन मिळालेले
नाही. त्याबाबत तक्रारदार यांनी खात्री केली असता त्यांच्या पत्नीचे सेवापुस्तकामध्ये घेतलेल्या नोंदीवर तत्कालीन गटशिक्षण अधिकारी भाऊसाहेब तुकाराम चव्हाण यांची स्वाक्षरी नसल्याने वेतन काढलेले नाही, भाऊसाहेब तुकाराम चव्हाण, उप शिक्षण अधिकारी, (माध्यमिक विभाग) जिल्हा परिषद नाशिक कार्यालय यांनी तक्रारदार यांच्या पत्नीचे सेवापुस्तकाच्या सदर कालावधीतील घेतलेल्या नोंदीवर सही करण्यासाठी तक्कारदार यांचेकडे १५,०००/- रूपये लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक कार्यालयात म्हणून तकार दिली होती.

तक्ररादार यांचे तक्रारीवरुन ला.प्र.वि. नाशिक पथकाने दिनांक १०/०७/२०२० रोजी पडताळणी करुन सापळा आयोजित केला असता भाऊसाहेब तुकाराम चव्हाण,उप शिक्षण अधिकारी, वर्ग- २, (माध्यमिक विभाग) जिल्हा परिषद नाशिक कार्यालय, जि.नाशिक यांनी तक्कारदार यांचेकडून १५,०००/- रूपये लाचेची मागणी केली व तडजोडी अंती पंच साक्षीदारांसमक्ष ६,०००/- रूपये लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम शिक्षण अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद नाशिक येथे स्विकारल्याने त्यांना पकडण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here