नाशिक – देवळा तालुक्याच्या चिंतेत भर; अजून एक रुग्ण करोना पॉझिटिव्ह

0

वेगवान न्यूज / मनोज वैद्य

नाशिक, दहिवड l देवळा तालुक्यातील गुंजाळनगर येथील ४५ वर्षीय एक पुरुष करोना पॉझिटिव्ह आल्याने देवळा तालुक्याच्या चिंतेत भर पडली असून तालुक्यात आता ३ रुग्ण करोना पॉझिटिव्ह आहेत.

दिनांक २८जून रोजी आलेल्या अहवालात तालुक्यातील देवळा येथिल एक पुरुष जो नगरपालिका देवळा येथे वसुली विभागात कामाला आहे तो व खुडेवाडी येथील मूळचा नाशिक येथून आपल्या मामाच्या गावाला आलेला १३ वर्षीय मुलगा करोना पॉझिटिव्ह आला होता.

त्यामुळे देवळा तालुक्यात चिंता निर्माण झाली होती. आज देखील गुंजाळनगर येथील एक ४५ वर्षीय व्यापारी करोना पॉझिटिव्ह आल्याने तालुक्याच्या चिंतेत भर पडली आहे. सदर व्यक्ती सध्या नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असून सर्व ३ रुग्णांची स्थिती स्थिर असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुभाष मांडगे यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here