नाशिक – छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्याला अटक करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी !

0

वेगवान न्यूज / उत्तम गायकर
इगतपुरी l छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य करणारा सौरव घोष याच्या विरोधात इगतपुरी
तालुका सकल बहुजन मराठा समाजाच्या वतीने घोटी पोलीस ठाण्यात निवेदन देऊन सदर इसमास अटक करुन गुन्हा नोंदविण्याची मागणी सकल बहुजन मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली .

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्यावर हशा ,टाळ्या वाजवणे याचा अर्थ महामानव ,विभूतींची थट्टा करुन अवमान करणे होय.यामुळे सकल समाजाच्या भावना दुखावल्या असुन त्वरित सदर इसमास अटक करून गुन्हा दाखल करावा .

अशा आशयाचे निवेदन शाहीर उत्तम गायकर,प्रताप जाधव, नारायण जाधव, शिवाजी मांडे, नंदकुमार जाधव, दर्शन भोर,महेंद्र वारुंगसे ,बाळु पुणेकर यांनी घोटी पोलीस ठाण्यात दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here