नाशिक – देवळ्यातील ६ दिवसापासून प्रतीक्षेत असलेले कोरोना रिपोर्ट प्राप्त ! काय आहे अहवाल?

0

वेगवान न्यूज / मनोज वैद्य

दहिवड –

देवळा तालुक्यातील कोव्हीड केअर सेंटर मधील ६ दिवसापासून प्रतीक्षेत असलेले ११ स्वॅब अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांनी दिली असून देवळा तालुक्यातील जनतेसाठी ही दिलासादायक बातमी आहे.
मेशी परिसरात पाहुणी म्हणून आलेल्या मुंबईच्या बाईचा उपचारा दरम्यान मृत्यु झाल्याने तिच्या संपर्कात आलेल्या मेशी येथील डॉक्टर व मृत महिलेचे काही नातेवाईक व तालुक्यातील इतर काही रुग्णांचे एकूण ११ स्वॅब देऊन साधारण ६ दिवस झाले होते मात्र नाशिक येथील करोना चाचणी लॅब बंद असल्याने अहवाल येण्यास उशीर झाल्याने जनतेत चिंतेचे वातावरण होते.
मात्र आज देवळा तालुक्याचे कोव्हीड सेंटर कडून पाठविण्यात आलेले सर्व ११ कोव्हीड संशयित रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ सुभाष मांडगे यांनी दिली. त्यामुळे तालुक्यातील जनतेने सुटकेचा सुस्कारा टाकला असून देवळा तालुक्यातील जनतेसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here