वेगवान न्यूज / समीर पठाण
लासलगाव l निफाड तालुक्यातील लासलगाव येथील मंडल अधिकारयाला साडेतीन हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे.रमेश निंबा बच्छाव असे लाच स्वीकारणाऱ्या मंडल अधिकाऱ्याचे नाव आहे.
लासलगाव येथे रमेश बच्छाव हे मंडळ अधिकारी म्हणुन कार्यरत आहे.तक्रारदाराकडून मंडळ अधिकारी बच्छाव यांनी ३५०० रुपयांची मागणी केली.येथील तक्रारदाराकडे खरेदी केलेल्या शेतजमिनीला त्यांचे नाव लावून नाव नोंदणी करण्यासाठी आज ३ हजार ५०० रुपयांची लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने याबाबतची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली.त्यानुसार निफाड शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय येथे सापळा रचण्यात आला.याठिकाणी साडेतीन हजाराची लाच स्वीकारताना मंडल अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनिल कडासने,अप्पर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे,दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी संदीप साळुंके,पोलीस निरीक्षक प्रभाकर निकम,पोलीस नाईक नितीन कराड,पो ना प्रभाकर गवळी,प्रकाश डोंगरे,परशुराम जाधव यांनी कारवाई केली